Farmers suicide in Maharashtra । राज्यात मागील काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत होता. यासाठी राज्यात केंद्रापासून ते राज्यातील बड्या नेत्यांनी राज्याचा कोपरान्एकोपरा धुंडाळून काढला. परंतु, या निवडणुकीच्या धामधुमीत सरकारकडून राज्यातील अत्यंत गंभीर प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येतंय. मागच्या ४ महिन्यात राज्यात मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. राज्यात 2024 मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक असल्याचे दिसून येतंय.
चार महिन्यांत 838 शेतकऱ्यांच्या आत्महत्या Farmers suicide in Maharashtra ।
जानेवारी ते एप्रिल2024 या चार महिन्यांत राज्यात तब्बल 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलंय. सर्वाधिक 235 आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत 208, मार्चमध्ये 215 आणि एप्रिलमध्ये 180 आत्महत्या झाल्याची नोंद झालीय. म्हणजेच चार महिन्यांत दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी मरणाला जवळ केल्याचे दिसत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत या गंभीर गोष्टीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येतंय.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी Farmers suicide in Maharashtra ।
राज्यातील अमरावती विभागात सर्वाधिक 383 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, छत्रपती संभाजीनगर विभागात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात 84, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोकणात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळमध्ये झाल्या आहेत.
या चार महिन्यांत अमरावतीमध्ये 116, यवतमाळमध्ये 108, वाशिममध्ये 77, जळगावमध्ये 62, बीडमध्ये 59, छत्रपती संभाजीनगरमध्ये 44, धाराशिवमध्ये 42, वर्धामध्ये 39, नांदेडमध्ये 41, बुलढाण्यात 18, धुळ्यामध्ये 16, तर अहमदनगरमध्ये 14 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
तर दुसरीकडे 838 पैकी यात 171 शेतकरी आत्महत्या प्रकरणे वैध आढळली. त्यात आतापर्यंत फक्त 104 शेतकऱ्यांनाच्या कुटुंबीयांना एक लाखाची आर्थिक मदत सरकारकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर 62 शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. त्याचबरोबर 605 शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. राज्यात आरोप प्रत्यारोप आणि फोडाफोडीच्या राजकारणात सरकार व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही का, असा सवाल शेतकरी कुटुंबियांकडून केला जात आहे.