बाजारपेठेत उलाढाल वाढणार
पुणे : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच खरीप हंगामासाठी हा पाऊस पोषक ठरत आहे. दरवर्षी जुलै महिन्यातच हजेरी लावणाऱ्या पावसाने यंदा मे महिन्यापासून सुरूवात केली. त्यामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात मॉन्सूनने सांगावा धाडला आहे. शेतकऱ्यांना पेरते व्हा, असा मॉन्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात संदेश घेऊन आला आहे. बाजारपेठेत येत्या दहा ते बारा दिवसांत बी- बियाणे, खते, औषध खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढणार आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामातील चित्र सकारात्मक बनले आहे. शेतकरी आशावादी झाला आहे.