शेतकऱ्याचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात सीए

लोणी काळभोर – चार्टर्ड अकौउंटंटच्या (सीए) परीक्षेत येथील एक शेतकऱ्याचा मुलगा प्रतिकूल परिस्थितीत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला आहे. हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागातील हा तिसरा सी ए आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पाटील वस्तीमधील अक्षय सुदाम काळभोर (वय 23) तरुणाने पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. अक्षयचे वडील सुदाम काळभोर शेतकरी आहेत. त्यांनी अक्षयला सुरवातीपासून त्याच्या मनाप्रमाणे शिक्षण दिले आहे. अक्षयने प्राथमिक शिक्षण लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले.

पुण्यातील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली आहे. बारावीनंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याने सीएच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यामुळे त्याने एका प्रतिथयश सीएकडे प्राथमिक धडे गिरवायला सुरवात केली होती. त्याने क्‍लासही लावला होता. तो बारा तास अभ्यास करत असे.

Leave A Reply

Your email address will not be published.