पुणे – शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कॅन्डी क्रश गेमची घुसखोरी झाली आहे. किसान पोर्टल उघडताच कॅन्डी क्रश गेम सुरु होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. शनिवारी शेतकऱ्यांना याचा अनुभव आला.
किसान पोर्टलवर नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना हवामान, पावसाचा अंदाज, सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजना, पिकांवर पडलेल्या रोगांवरील उापययोजना अशा विविध बाबतीत मार्गदर्शन केले जाते. याच पोर्टवरुन शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत मेसेज पाठविण्यात आला होता. मात्र, हा मेसेज उघडताच लहान मुलांकरिता असलेल्या कॅन्डीक्रश गेमची लिंक ओपन होत होती.
सध्या, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा राज्यात गाजत आहे. दि. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालवधीतील अल्पमुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली आहे. तर दोन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कर्जाऊ रकमेच्या तसेच नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अद्यापही निर्णय होणे बाकी आहे. त्यामुळे किसान पोर्टलवरुन आलेला मेसेज उघडताच कॅण्डीक्रश गेम सुरु होत आहे.