वाघोली – पूर्व हवेलीतील ग्रामस्थांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी प्रस्तावित (CRESCENT RAILWAY) रेल्वे मार्ग रिंगरोड सोबत प्रस्तावित केलेला आहे. त्याबाबत शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना दिले.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव गोते, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सतीश नागवडे यांनी सदर रेल्वे मार्गामुळे मार्गामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच गटाचे विभाजन होत असून जाणे-येण्यासाठी पर्यायी रस्ता राहिलेला नाही.
सदर रेल्वे मार्गामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्यामुळे ते भूमिहीन होणार आहे. सदर रेल्वे मार्गामुळे शेतीच्या पाईपलाईनचे तसेच विहिरी, बोरवेल, शेततळे तसेच रस्त्यांचे नुकसान होणार असून शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागणार आहे. तरी प्रस्तावित रेल्वेमार्गास ग्रामस्थांचा विरोध असून प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्यात यावा असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला असल्याची माहिती खासदार डॉ. कोल्हे यांना दिली.
यावेळी सरपंच यशवंत गव्हाणे, शिरसवडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच किरण शिंदे, किरण गायकवाड, तुषार गायकवाड, राहुल गडदे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.