इंदापूर तालुक्यातील शेतकरी राज्यमंत्री भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – हामा पाटील

कौठळी येथे शेतकऱ्यांनी सोलापूरकरांच्या नावाने बोंब ठोकली

रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नती साठी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाकडी – निंबोडी योजनेसाठी प्रामाणिक प्रयत्न केला.शासनाचा मोठा निधी दिला.मात्र विरोधकांच्या पोटात राजकीय गोळा आला आणि त्यांनी ही योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सोशल मीडिया प्रमुख हामा पाटील यांनी केले. 

इंदापूर तालुक्यातील कौठळी गावामध्ये शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने सोलापूरकरांचा जाहीर निषेध करून  शनिवार ( दि. २२ ) रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी माणिक महाराज मारकड, माजी पोलिस पाटील रामभाऊ पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष हामा पाटील, उपसरपंच सुनील खामगळ, वसंत मारकड, हिरामण मारकड, अनिल पवार, नामदेव पाटील, आण्णा काळेल, संदीपान मारकड, अशोक राऊत, राजू पिसाळ, सोमनाथ पाटोळे, संदीप चितारे, महादेव मोरे, बापू खामगळ, भारत यमगर,अविनाश मारकड,जिगर मारकड,आरीफ पठाण, दिपक माने,अमर जाधव,ऋषिकेश मारकड, सागर पाटोळे,रमेश पाटोळे,अमित पाटील,अंकुश चितारे, पांडुरंग यमगर,नामदेव खामगळ,अभिजीत खामगळ शिवाजी खामगळ,विजय मारकड,बापुराव मारकड,सोपान मारकड व अनेक शेतकरी उपस्थित होते.

पुढे बोलताना हामा पाटील म्हणाले की,सोलापूर जिल्हा पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला पाच टिएमसी पाणी दिल्यानंतर,सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी विरोध, करुन सरकारवर दबाब टाकून निर्णय रद्द करण्याचा तगादा लावला.त्यामुळे आम्ही कौठळी गावातील शेतकरी सोलापुरच्या राजकिय लोकांचा जाहीर निषेध करतो.म्हणत उपस्थित शेतकऱ्यांनी सोलापूरकरांच्या नावाने बो बो बो करत बोंब ठोकली. जर इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या आठ सोलापूरकर येत असतील तर आडवे करू असाही इशारा हामा पाटील यांनी दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठिशी तालुक्यातील शेतकरी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्याच बरोबर आमच्या हक्काचे पाणी जो पर्यंत मिळत नाही, तो पर्यंत संघर्ष करत राहणार तसेच हक्काच्या पाण्यासाठी कायम लढा देणार असल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला. यावेळी बोंबाबोंब करून शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. त्याच बरोबर ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा घोषणा दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.