कात्रज – भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी माजी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांच्या नेतृत्त्वाखाली बालाजीनगर येथे एलोरा पॅलेसजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
बालाजीनगर, धनकवडी, कात्रज-आंबेगाव पठार परिसरामध्ये सकाळपासूनच अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद होती. आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत. भाजप सरकारने हा कायदा रद्द करावा, असे दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक आप्पा रेणुसे, खडकवासला रा.कॉं. मतदार संघाचे कार्याध्यक्ष, नगरसेवक संतोष फरांदे, विनायक काकडे, रत्नाकर कारकर, सुलभा सांडभोर, वैशाली खुटवड, मीना पांचाळ, मनीषा जाधव, कार्वेकर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.