-पिंपळे जगताप येथील तरकारी व भाजीपाला बाजार 3 ऑगस्ट पासून होणार सूरु
-शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांची माहिती
शिरुर ( प्रतिनिधी) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार आवारात भरणारा शेतकरी बाजार उद्या दिनांक 29 जुलै पहाटे तीन वाजल्यापासून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरविण्यात येणार आहे तर पिंपळे जगताप येथील तरकारी व भाजीपाला बाजार सोमवार दिनांक 3 ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याची माहिती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्यात, शिरूर शहरात वाढता कॉरोनाचा पादुर्भाव यामुळे शिरूर शहरात गेली दहा दिवसापासून पूर्णपणे लॉक डाऊन करण्यात आले होते. त्यामुळे शिरूर बाजार समिती आवारात शेतकरी बाजार दहा दिवस बंद ठेवण्यात आला होता. हे लॉक डाऊन आज संपत असल्याने शेतकरी बाजार उद्या पहाटे तीन वाजल्यापासून पुन्हा सुरू होणार आहे.
तर पिंपळे जगताप येथील भाजीपाला मार्केट मधील आडतदार व शेतकरी कोरोना ग्रस्थ आढळले होते. यामुळे पिंपळे जगताप बाजार समिती परिसरातील आडत व शेतकरी बाजार प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाले होतं. त्यामुळे बंद ठेवण्यात आला होता. आता प्रतिबंध क्षेत्र केल्याचे दिवस संपले असल्याने हाही बाजार तीन ऑगस्ट पासून पूर्ववत सुरू होत असल्याचे सभापती शंकर जांभळकर यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला व तरकारी यार्ड वरच विक्री करावा असे आवाहन उपसभापती विकास शिवले यांनी केले.
शिरूर व पिंपळे जगताप येथील अनुक्रमे शेतकरी बाजार व आडत बाजार सुरू होत आहे. तरी शेतकरी व्यापारी कर्मचारी हमाल माथाडी सर्वांनी कोरोना पादुर्भाव लक्षात घेता तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सं पाळणे, गर्दी करू नये, हात धुणे, सॅनीटायझर चा वापर करणे या सर्व शासकीय नियमांचे पालन करावे, असे आव्हान शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांनी केले आहे.