ओझर : महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर हे तरुण, होतकरू व कार्य कुशल नेतृत्व आहे. ते जुन्नर विधानसभेत गेल्यानंतर तालुक्याचे हित जोपासतील आणि मोठ्या प्रमाणे विकास निधी आणतील असा विश्वास पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक, आदिवासी समाजाचे नेते तुळशीराम भोईर यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.
जुन्नर येथे आयोजित सभेत तुळशीराम भोईर हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर, माजी आमदार दिलीप ढमढेरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, जेष्ठ नेते अनंतराव चौगुले, उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, मोहित ढमाले, अंकुश आमले, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाध्यक्ष तुषार थोरात, वैभव तांबे, मोहन बांगर, मंगेश काकडे, बाजीराव ढोले, शरद चौधरी , सुनील मेहेर, अनिल मेहेर, अभिजित शेरकर, सईद पटेल, नारायणराव गायकवाड, वैभव तांबे, सुरेखा वेठेकर, सुरेखा मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
तुळशीराम भोईर म्हणाले कि, श्री विघ्नहर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रपंच उभे राहिले आहेत. त्यांवेळी शेठ बाबांनी गावोगावी जाऊ शेतकऱ्यांना ऊस लावण्यास प्रेरणा दिली. त्यानंतर कारखाना चांगला चालला आणि याच कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. आज कोणत्याही शेतमालाला बाजारभाव नसल्याने हमी बाजारभाव फक्त ऊसालाच मिळतो.
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लावून आपल्या आर्थिक उन्नती केली आहे. आजही शेरकर कुटुंबीय शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत आहे. निवृत्तीशेठ शेरकर उर्फ शेठ बाबा, सोपान अण्णा शेरकर आणि त्यानंतर सत्यशील शेरकर यांनी शेतकऱ्यांची हित लक्षात घेऊन चांगली सेवा केली असल्याने या कुटुंबातील सदस्य असलेल्या सत्यशील शेरकर यांना विधानसभेत मोठे मताधिक्याने पाठवावे असे आवाहान तुळशीराम भोईर यांनी केले.
यावेळी सत्यशील शेरकर म्हणाले कि, शिवसेनेचा उमेदवारी मागण्याचा अधिकार होता. शिवसेनेची तालुक्यात तेव्हढिच तोलामोलाची ताकद आहे. आमच्यात तेढ निर्माण झाला नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार करायचा हे निश्चित होते. माऊली व शिवसेनेचे आभार मानतो. त्यांच्या मुळे वेगळ्या प्रकारचे ताकद आघाडीत निर्माण झाली आहे. जुन्नर तालुक्यात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. तरुणांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याची ग्वाही देत पठार आणि आदिवासी भागात पाणी प्रश्न आहे तो देखील सोडविण्याचा प्रयत्न करू असा विश्वास शेरकर यांनी व्यक्त केला.