काँग्रेसची शेतकरी कर्जमाफी म्हणजे निवडणुकांपूर्वीची जाहिरातबाजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

जम्मू : तीन राज्यांमध्ये सरकार स्थापनेनंतर काँग्रेसद्वारे शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेवर जोरदार हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसच्या शेतकरी कर्जमाफीस निवडणुकांपूर्वीचे ‘गाजर’ ठरवले. काँग्रेस निवडणुकांपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा वापर केवळ निवडणुकांमध्ये मतं मिळविण्यासाठी करत असून यापूर्वीही काँग्रेसने असे डाव खेळले आहेत, असा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना केला.

यावेळी बोलताना मोदींनी आपल्या सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकताना ५ एकर पेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपयांची वार्षिक मदत करणाऱ्या थेट उत्पन्न योजनेची प्रशंसा केली.

पंतप्रधान म्हणाले, “यापूर्वीच्या सरकारांनी शेतकरी कर्जमाफीमध्ये देशातील ७० ते ८० टक्के गरीब शेतकऱ्यांचा समावेशच केला नाही, अशा शेतकऱ्यांचं काय? मोदी सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या थेट उत्पन्न योजनेमुळे अशा गरीब, वंचित शेतकऱ्यांना प्रथमच लाभ मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
6 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)