शेतकरी आत्महत्येला राजकारणाचा “गजकर्ण”

बुलढाणा : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सभे पूर्वी एका तरुण शेतकऱ्याने पुन्हा अनुया आपलं सरकार हा ती शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना बुलढाण्यात घडली होती. याच जिल्ह्यात आता पुन्हा आणखीक एक धक्कादायक घटना घडली आहे. सतीश गोविंद मोरे ( वय -२१) तरुणाने काँग्रेसचा टीशर्ट अंगात घालून आत्महत्या केली आहे.

बुलढाण्यात धाड येथे एका हि घडली आहे. सतीश हा सुशिक्षित बेरोजगार असल्याने मोलमजूरी करून कुटुंबाचे पालनपोषण करत होता, त्याच्या घरी आई-वडील आणि एक भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळाताच धाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह बुलडाणा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच. याप्रकरणी धाड पोलीस अधिक तपास करत आहेत.

बुलडाणा जिल्हायातील या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी राजू तलवारे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्याच्या अंगावर ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ असं लिहलेला भाजपचा टी-शर्ट होता. त्यानंतर ही दुसरी घटना समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.