नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गला कोल्हापूरात शेतकरी संघटनेचा विरोध; शेतकऱ्यांनी 400 नोटिसा पेटवल्या

कोल्हापूर/प्रतिनिधी – प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग हा कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील भुये, भयेवाडी, केर्ली, केर्ले, पडवळवाडी या गावातून जात आहे. मात्र गावातील शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता थेट 400 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा लागू केल्या आहेत.

या नोटिशेच्या निषेधार्थ आज रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने या 400 नोटीशीची दसरा चौकात होळी केली5 आहे. तसेच नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट माणिक शिंदे यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आल आहे.

प्रस्तावित नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग मुळे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील भुये, भयेवाडी, केर्ली, केर्ले, पडवळवाडी या गावातून हा मार्ग जात आहे. या महामार्गाच्या भूमी संपादनाच्या नोटिसा आणि मोजणी नोटिसा गावातील शेतकऱ्यांना लागू केले आहेत.

खरंतर या भागातून सन 2019 आणि सन 2021 आली आलेल्या महापुरात 10 ते 20 फूट पाणी होते.सदरचे क्षेत्र हे सगळे पूरप्रवण क्षेत्र असून या भागातून रस्ता जात आहे. तसेच या पट्ट्यातील जवळपास चारशे शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत.

विहिरी ,बोरवेल , झाडे या राष्ट्रीय संपत्तीचे व जलस्रोतांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या परिस्थितीची सरकारने दखल घ्यावी आणि नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग या परिसरातून जाऊ देऊ नये या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने नोटिसा जाळून आंदोलन करण्यात आला आहे.यावेळी परशुराम शिंदे , मानसिंग पाटील, भानुदास पाटील, अनिता जाधव यांचेसह आधी आंदोलन उपस्थित होते

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.