उपसाबंदी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक ; शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेतला घेराव

कोल्हापूर: कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील उपसाबंदी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.  शेतकरी विकास समितीच्या वतीनं आज कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालत पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा ते तेरवाड बंधारा दरम्यानची उपसाबंदी कायमस्वरूपी उठवण्याची मागणी त्यांनी केलीय.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट परिसरातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी आज सिंचन भवन च्या कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांची भेट घेत पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा ते तेरवाड बंधारा दरम्यानची उपसाबंदी कायमस्वरूपी उठवण्याची मागणी त्यांनी केलीय. यावेळी शेतकऱ्यांनी बांदिवडेकर यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केलीय. उपसाबंदी उठवावी या मागणी सोबतच शेतकऱ्यांची पाणी पट्टी माफ करून मोफत वीज पुरवठा करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय

कोल्हापूरच्या पंचगंगा नदी वरील उपसा बंदी कालावधी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पावसापूर्वी जिल्यातील शेवटच्या घटकाला पिण्याचं पाणी मिळावं म्हणून उपसाबंदी केली आहे.

सिंचन विभागाने उपसाबंदी कायमस्वरूपी उठवली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.