नाशिक- एका शेकऱ्याला 4 एकर शेती कोथिंबीरीला 41 दिवसात 12 लाख 50 हजार रुपये मिळाले आहे. त्याच पैशांसोबतचा शेतकऱ्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. एखाद्या गोष्टींवर दोष देत राहण्यापेक्षा त्या गोष्टींवर मार्ग काढून गोष्ट पुर्णत्वास न्यावी, हे वाक्य हा शेतकरी जगताना दिसतो. त्या फोटोतील चेहऱ्यावरचा आनंदच सगळं काही सांगून जात आहे. मात्र हा शेतकरी नेमका आहेत तरी कोण?
या शेतकऱ्याचं नाव विनायक हेमाडे असून हा शेतकरी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदुरसिंगोटे या गावात राहतो. या शेतकऱ्याने आपल्या चार एकर जमिनित कोथिंबीरीची लागवड केली होती. त्यातील एक कोथिंबीरीचा प्लाॅट १२,५१०००/- रूपयाला विकला. कोरोना काळात शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नातुन अर्थ प्राप्ती झाल्याने आनंदित झाला आहे.
कोरोना काळात शेती सर्वाधिक उत्तम व्यवसाय ठरला. अनेक तरुण सुद्धा शेतीकडे वळले. त्यात विविध प्रयोग तरुणांनी सुरु केले. याच प्रयोगातून कमी कामात किंवा भांडवला उत्तम उत्पन्न कशा रितीने मिळवता येईल यावर तरुणांचा कल होता. पारंपारीक शेती पद्धतीत प्रयोग केल्यानंतर अनेकांनी आधुनिक शेतीचा वापर करण्याचाही प्रयत्न केला.
दरम्यान, शेती व्यवसाय असाच प्रगत होत गेला. तरुणांनी शेतीत ऱुची निर्माण केली. वेगवेगळे प्रयोग सुरु केले. तर भारतातील प्रत्येक शेतकऱ्याचा चेहऱ्यावर असंच हसु उमटेल.