Farmer Tractor Rally | ‘तो’ फोटो शेअर करत कंगनाचा दिलजीत, प्रियंकाला थेट सवाल; म्हणाली…

नवी दिल्ली – गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आंदोलक शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र यावेळी आंदोलकांनी दिल्लीच्या रस्त्यांवर तुफान राडेबाजी केली. एवढंच नव्हे तर दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंदोलकांनी आपला ध्वज देखील फडकावला. ( Farmer Tractor Rally )

दरम्यान, दिल्ली येथे उफाळलेल्या या हिंसाचारानंतर अभिनेत्री कंगना रनौतने शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा व अभिनेता-गायक दिलजीत दोसांज यांना चांगलाच टोला लगावला आहे.

कंगनाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून लाल किल्ल्यावरील एका खांबावर चढून आपला ध्वज फडकावणाऱ्या शेतकरी आंदोलकाचा फोटो ट्विट करत या पोस्टमध्ये प्रियंका चोप्रा व दिलजीत दोसांज यांना टॅग केले आहे. ट्विट केलेल्या फोटोसोबत लिहलेल्या संदेशात कंगना म्हणते, ‘तुम्ही याबाबत स्पष्टीकरण द्या. संपूर्ण जग आज आपल्यावर हसतंय. हेच हवं होत ना तुम्हा लोकांना?’ ( Farmer Tractor Rally )

तत्पूर्वी, शेतकरी आंदोलनावरून सातत्याने टिपणी करणाऱ्या कंगना रनौतला अभिनेता-गायक दिलजीत दोसांजने सडेतोड उत्तर दिलं होत. दोघांमध्ये अनेकदा ‘ट्विटर-वॉर’ही रंगलं असून कंगनाने आंदोलक शेतकऱ्यांविरोधात तर दिलजीतने शेतकऱ्यांची बाजू मंडळी आहे. प्रियंका चोप्राने देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.