‘शेतकरी आत्महत्येचा आकडा १६ हजारांवर; फडणवीस सरकार कधी जागे होणार?’

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या कारणावरून त्यांनी भाजलाप लक्ष केले. राज्यातील फडणवीस सरकार झोपेतून कधी जागे होणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

कर्जबाजारीपणा, वाढत्या महागाईला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १६ हजारांवर पोहचली आहे. गेल्या सात महिन्यांत राज्यातील यवतमाळ जिल्ह्यांत १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर गेल्यावर्षी यवतमाळमध्ये २५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी राज्यात ११०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने समोर म्हटले आहे. राज्यातील फडणवीस सरकार झोपेतून कधी जागे होणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे. यावर्षीच्या ओल्या आणि कोरड्या दुष्काळाने राज्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांनी सहकारी शेती पतसंस्था, बँका, खासगी सावकाराकडून घेतलेली कर्जे फिटता फिटत नाहीत.  आपल्या शेतीवर जप्ती येणार या भीतीने शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. वर्षभर शेतात राबून जर हाती काही लागणार नसेल आणि सरकार काही भरपाई देणार नसेल तर असे सरकार काय कामाचे असा प्रश्न शेतकरी विचारु लागला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती आणि शेतकरी राजाला केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था भीषण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.