भाजप समर्थक आणि विरोधकांत ‘जुंपली’; अमित शहांचा ‘तो’ फोटो शेअर करत अभिनेता एजाज खान म्हणाले…

नवी दिल्ली – सोशल मीडियामुळे ताज्या घटनांवर रिऍक्‍ट होण्याची अनेकांना संधी मिळाली आहे. त्याकरता त्यांना कोणत्या इलेक्‍टॉनिक अथवा मुद्रीत माध्यमांची गरज भासत नाही. आपल्या हातात स्मार्ट फोन असेल आणि फेसबुक, ट्‌वीटर अथवा इन्स्टाग्राम अकाउंट असेल तर कोणीही काहीही व कोणत्याही विषयावर भाष्य करू शकतो.

बरेच कलाकार या माध्यमांचा लाभ घेताना दिसतात. काही जण पूर्णवेळ सक्रिय असतात. कलाकार एजाज खान हाही त्यापैकीच एक त्याने आता भारतीय जनता पार्टीला लक्ष्य करणारा फोटो आणि मजकूर सोशल मीडियावर जारी केला आहे. त्यात भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका प्रचारसभेचा फोटो टाकण्यात आला आहे.

दिल्लीच्या सीमेवर दाखल झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताना एजाज खानने म्हटले आहे की शेतकरी एकत्र आले की करोनाचा प्रसार होतो असे यांचे (सरकार आणि भाजपचे नेते) म्हणणे आहे. मात्र यांच्या प्रचारसभा होतात तेव्हा त्यात काय करोनाची लस तयार होते का, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक आहे. कोणी येथे काही टिप्पणी केली की, त्यावर लगेचच प्रतिक्रियांचा भडीमार सुरू होतो. तसा या टिप्पणीबाबतही झाला आहे. बऱ्याच जणांनी खानच्या विधानावर संताप व्यक्त करत त्याची कागदपत्रे जमा करून त्याला पाकिस्तानात पाठवा असा सल्ला दिला आहे, तर काही जणांनी याचाच अधार घेत नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.

एका व्यक्तीने म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या अंदोलनामागे भाजपला व नेत्यांना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा हात दिसतो आहे. मात्र जेव्हा निवडणुकीत नेता निवडीची वेळ येते तेव्हा भाजपचे हेच लोक राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवताना दिसतात. असा दुटप्पी प्रचार करणाऱ्यांवर विश्‍वास ठेवणाऱ्यांना एकतर मूर्ख म्हटले पाहिजे किंवा त्यांना अंध भक्त तरी म्हटले पाहिजे.

एकीकडे करोनाची लस मिळण्यासाठी मारामार सुरू आहे. मात्र अंधभक्तीची ही लस भारतात मोफत मिळते आहे. आतापर्यंत 30 टक्के लोकांना ती लस देण्यातही आली आहे. भाजपचा आयटी सेल, गोदी मीडिया आदी ठिकाणी ती मोफत दिली जात असून संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा अशी खोचक टिप्पणी एका यूजरने केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.