Farmer leader Dallewala | शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल २६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करत आहे. त्यांची प्रकृती देखील खालवत होती, मात्र ते उपचार घेण्यास नकार देत होते. अखेर जगजीत सिंग डल्लेवाल यांनी वैद्यकीय उपचार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
तत्पूर्वी केंद्र सरकारच्या एका प्रतिनिधीने शनिवारी शेतकरी नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांनी 14 फेब्रुवारीला केंद्राच्या प्रतिनिधींशी बोलण्याचे मान्य केले आहे. तसेच मागण्यांवरील चर्चेसाठी पुढच्या महिन्यात चंडीगड येथे निमंत्रित केले आहे.
जगजीत सिंग डल्लेवाल यांनी वैद्यकीय मदत घेण्याचे मान्य केले असले तरी ते उपोषण सुरूच ठेवणार असल्याचेही शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे. डल्लेवाल यांच्या मृत्यूला शनिवारी 54 वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एसकेएम संयोजक डल्लेवाल गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. Farmer leader Dallewala |
केंद्रीय कृषि मंत्रालयाच्या संयुक्त सचिव प्रिया रंजन यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने डल्लेवाल यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. तसेच प्रिया रंजन यांनी डल्लेवाल यांना त्यांचं आमरण उपोषण संपवण्याची विनंती केली.
14 फेब्रुवारी रोजी बैठकीसाठी निमंत्रित
दरम्यान, शेतकरी नेत्यांना 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाचता चंडीगडमधील सेक्टर-२६मध्ये महात्मा गांधी लोकप्रशासन संस्थानामध्ये एका बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले. हे निमंत्रण डल्लेवाल यांच्यासह एसकेएम (एनपी) आणि केएमएमचे समन्वयक सरवर सिंह पंधेर यांना देण्यात आलं आहे. Farmer leader Dallewala |
शेतकरी नेते अभिमन्यू कोहर यांनी सांगितले की, शेतकरी नेत्यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. केंद्राच्या प्रतिनिधींनी आम्हाला १४ फेब्रुवारीला बैठकीसाठी बोलावले आहे. ही बैठक आधी व्हावी, अशी आमची मागणी होती, मात्र दिल्लीतील आचारसंहितेमुळे ९ फेब्रुवारीपूर्वी ही बैठक होऊ शकत नाही, असे केंद्राने म्हटले आहे.
डल्लेवाल यांच्यावर उपचार सुरू
केंद्रासोबत होणाऱ्या बैठकीला शेतकरी नेते डल्लेवाल यांनी उपस्थित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे शेतकरी नेते कोहर यांनी म्हटले आहे. डल्लेवाल यांनी याबाबत सांगितले की, जर आमरण उपोषण करत असलेल्या १२१ शेतकऱ्यांनी मला सांगितले तर मी उपचार घेईन. मात्र जोपर्यंत एमएसपीला कायदेशीर हमी मिळत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही. त्यानंतर उपोषण करत असलेल्या १२१ शेतकऱ्यांनी डल्लेवाल यांना उपचार घेण्याची विनंती केली आणि डल्लेवाल यांनीही उपचार घेण्याचं मान्य केलं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. Farmer leader Dallewala |
हेही वाचा:
EPFO ने ‘या’ नियमात केला महत्त्वाचा बदल, कोट्यावधी कर्मचाऱ्यांना होणार फायदा