चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना उघडकीस आली आहे. यात एक 42 वर्षीय शेतकरी ठार झाला आहे. हा हल्ला ब्रम्हापुरे येथे शनिवारी सायंकाळच्या वेळेस घडला. जगदीश मोहुर्ले असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जगदीश मोहुर्ले हे शनिवारी सायंकाळच्या वेळेस जंगलालगत असलेल्या शेतात काम करत होते. यावेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रपूर सर्कलचे वनप्रमुख एस. व्ही. रामाराव यांनी दिली.