अकोला – जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी येथील ३२ वर्षीय शेतकऱ्य़ाने आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापुर्वी एक व्हिडिओ क्लिप बनवली आहे. कर्जबाजातून शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊन उचलले आहे.
…तरचं माझ्या आत्म्याला शांती मिळेल; व्हिडिओ क्लिप बनवत शेतकऱ्याची आत्महत्या (व्हिडिओ) pic.twitter.com/slBf3qBcUL
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 20, 2021
प्रविण बाबूलाल पोळकट असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून प्रविण यांनी आत्महत्येपुर्वी एक व्हिडिओ बनविला आहे. त्यामध्ये आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आधिच कर्जबाजारी असलेल्या प्रविण यांचे ट्रॅक्टर काल फायनान्स कंपनी घेऊन गेली. त्यामुळे त्यांच्यावर आणखीच ताण वाढला यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
प्रविण यांच्या मागे आई-वडिल, पत्नी दोनी मुली आहेत. तसेच त्यांच्या वडिलांनी कॅन्सर सुद्धा आहे. तीन एकर शेती आणि घरची मोठी जबाबदारी एकट्या प्रविणवर असल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात ते सापडले होते. त्यांच्यावर को. ऑप बँक तसेच महिंद्रा कोटकचे कर्ज होते. शेतकरी प्रविण यांनी आत्महत्येपुर्वी केलेल्या व्हिडिओ मध्ये महिंद्रा कोटकचे कर्ज असून त्यांनी ट्रॅक्टर जप्त केला आहे. तसेच माझ्या आत्महत्येला बॅंक जबाबदार असून त्यांना कडक शिक्षा झाली तरचं माझ्या आत्म्याला शांति मिळेल असे या व्हिडिओत शेतकरी म्हणाला आहे.