हिंगोली : मशागत करीत असताना ट्रॅक्‍टर विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोली – पेरणीसाठी मशागत करीत असताना जमिनीलगत असलेल्या विहिरीत ट्रॅक्‍टर पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी कळमनुरी तालुक्‍यातील कसबे धावंडा येथे घडली.

कसबेधावंडा येथील शेतकरी सचिन मिराशे (वय 28) हे शेतात ट्रॅक्‍टरने रब्बी पेरणीसाठी मशागत करीत होते. मशागत करीत असताना त्यांच्या शेतात असलेली विहीर त्यांच्या लक्षात आली नाही आणि ते ट्रॅक्‍टरसह विहिरीत पडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना शेजारच्या शेतकऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेला ट्रॅक्‍टर बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणली गेली. त्यानंतर ट्रॅक्‍टर विहिरीच्या बाहेर काढला गेला. त्यानंतर विद्युत मोटार लावुन विहिरीतील पाणी बाहेर काढल्यावर सचिन मिराशे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मिराशे यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.