शेतकरी आंदोलक सज्ज; दोन लाख ट्रॅक्‍टरचा सहभाग

नवी दिल्ली, दि. 24 – केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनाचा भाग म्हणून प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ट्रॅक्‍टर संचलनात दोन लाख ट्रॅक्‍टर सहभागी होतील. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अडीच हजार कार्यकर्ते नेमण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी रविवारी दिली.

या संचलनाला होणारी गर्दी पाहून वाहतूक नियंत्रक कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्यात येईल. ही सर्व व्यवस्था पाहण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात येईल, असेही या नेत्यांनी स्पष्ट केले. कीर्ती किसान युनियनचे अध्यक्ष निर्भीसिंग धुदिके यांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी पंजाबमधून एक लाख ट्रॅक्‍टर दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत.

या संचलनाच्या नियोजनासाठी सिंघू सीमेवर तीन तास बैठक घेण्यात आली. दिल्लीच्या राजपथावरील संचलन दुपारी 12 वाजता संपेल. त्यानंतर ट्रॅक्‍टर संचलन सुरू होईल. या संचलनाच्या नियंत्रणासाठी केंद्रीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ते या संचलनाच्या तयारीकडे लक्ष देत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.