बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर लवकरच आपल्या आगामी स्पोर्टस ड्रामा “तूफान’ चित्रपटात झळकणार आहे. यात तो एका बॉक्सरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून फरहान प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये आतापासून उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
फरहानने नुकताच 2 वर्षांपूर्वीचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा त्याने या चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी ट्रेनिंग सुरू केले होते.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत फरहानने लिहिले की,’Let’s start at the very beginning .. Throwback to March 2019 and still early days of training in the ring with @drewnealpt .. Drew pointed out that Im still not relaxed in the shoulders and still not moving my feet to good effect. I’m actually trying to not sit down in between sets (didn’t tell Drew that though) Work in progress with progress being the work.’
View this post on Instagram
“तुफान’मध्ये फरहान अख्तर हा एका गुंडाची भूमिका साकारत आहे, जो पुढे चालून एक राष्ट्रीय मुष्टियोद्धापर्यतचा प्रवास पूर्ण करतो. या भूमिकेसाठी फरहान हा दिर्घ काळापासून ट्रेनिंग घेत आहे. तो आपली प्रत्येक भूमिका साकारण्यासाठी समर्पण भावनेने कठोर परिश्रम घेत असतो आणि यासाठीच तो
ओळखला जातो.