2 ऑक्‍टोबरला येणार फरहान अख्तरचा “तुफान’

मुंबई  : आपल्या आगामी “तुफान’सिनेमातला फर्स्ट लुक फरहान अख्तरने गुरुवारी रिलीज केला. हा सिनेमा या वर्षी 2 ऑक्‍टोबरला रिलीज होणार आहे. यातील एका फोटोला फरहान अख्तरने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. निळ्या बॉक्‍सिंग कॉश्‍च्युममध्ये तो बॉक्‍सिंग रिंगमध्ये उभा असलेला या फोटोमध्ये दिसतो आहे.

त्याच्या या लुककडे बघून रॉकीमधील सिल्व्हरस्टन स्टॅलोनची आठवण होते. “आयुष्य जसे जसे कठोर बनत जाते. तसे तुम्ही स्वतः कठोर बनत जाता. या वर्षी 2 ऑक्‍टोबरला “तुफान’येणार आहे.’ असे फरहानने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. नव्या वर्षाला सुरुवात होत असताना या नव्या फिल्मचा फर्स्ट लुक फॅन्सबरोबर शेअर करायला आपल्याला अधिक आवडते आहे, असेही तो म्हणाला आहे.

रितेश सिधवानी आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याबरोबर या सिनेमाची सहनिर्मितीही फरहान अख्तरने केली आहे. सिनेमाच्या डायरेक्‍शनची जबाबदारी राकेश मेहरा सांभाळत आहेत. फरहान अख्तरचा हा दुसरा स्पोर्टस वर आधारित सिनेमा असेल. यापूर्वी त्याने लीड रोल केलेल्या धावपटू मिल्खा सिंग यांच्या बायोपिकला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला होता.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.