फरहान अख्तरने आपल्या आगामी “तुफान’ चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरनंतर खूपच चर्चेत आला आहे. एका बॉक्सरची आव्हानात्मक भूमिकेसाठी त्याने आपल्या कौशल्यपूर्ण अभिनयाने एक नवीन मानदंड स्थापित केल्याचे दिसून येत आहे. वास्तविक जीवनातही फरहान हा आपल्या निवडक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो. तसेच त्याने कधीही नॉन-फिटनेसचा प्रवास केलेला नाही; परंतु आता तो पहिल्यांदाच तुफानासह आपल्या दमदार अभिनयासह चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
स्पर्धात्मक खेळाडूची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी फरहानला बॉडी ट्रांसफॉर्मेशनही करावे लागले आणि यासाठी फरहानने व्यावसायिक बॉक्सिंगचेही प्रशिक्षण घेतले आहे. त्याला आधी चित्रपटाच्या एका भागासाठी आपले वजन कमी करायचे होते. त्यानंतर चित्रपटाच्या एका भागासाठी त्याला ते पूर्ववत करायचे होते. यासाठी त्याला 6 आठवड्यांत 15 किलो वजन वाढविणे आवश्यक होते. हे त्याच्यासाठी एक मोठे आव्हान होते.
दरम्यान, “तुफान’ चित्रपटाचे शूटिंग मुंबईतील डोंगरी आणि गेट वे ऑफ इंडिया येथे शूट करण्यात आलेले आहे. या चित्रपटात फरहानशिवाय मृणाल ठाकूर आणि परेश रावल मुख्य भूमिका साकारत आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.