Nashik News | नाशिकमधील गंगापूररोडवरील कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या ठिकाणी तरूण-तरूणींना १०० ते २०० रूपयात रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अत्यंत अंधार असलेल्या या कॅफेबाबत तक्रारी आल्यानंतर आज दुपारी आमदार देवयानी फरांदे यांनी विद्या विकास सर्कल जवळील हॉटेल मोगली कॅफे येथे पोलिसांना घेऊन धडक दिली.
या कॅफेमध्ये तरूण-तरूणींकडून अश्लील चाळे केले जात होते. फरांदे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकत रंगेहाथ पकडले. कारवाई केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
कॅफेवर कारवाई केल्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या कॅफेमध्ये भाड्यानं तासांसाठी रूम दिले जात होते. याची माहिती मिळाल्यानंतर मी धाड टाकली. हे भयंकर प्रकार गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू होते. नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम सुरू आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. Nashik News |
‘कॉलेजला न जाता तरूणवर्ग कॅफेला येतात. व्यक्तिगत जीवानावर आम्ही जात नाही. पण ड्रग्जबाबत मी खपवून घेणार नाही. इंदिरानगर भागातील तक्रारी येत आहे. मी कटाक्षाने लक्ष घालत आहे. माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी धाड टाकली आहे. स्थानिक पोलिसांना पोहचायला उशीर झाला आहे. कॅफेच्या अडून गैरवापर केला जात आहे. यात मुलींची फसवणूक होऊ शकते. इंदिरानगरला सुद्धा असेच सुरू होते, याची दखल घेत यावर कारवाई झाली आहे,” असेही आमदार फरांदे म्हणाले. तसेच मुलं खरच कॉलेजला जातात की नाही हे पालकांनी बघावे, असे आवाहनही फरांदे यांनी केले आहे. Nashik News |
हेही वाचा: