मुंबई – जुन्या गाजलेल्या सिनेमांचे रिमेक बनवणाचा ट्रेन्ड सध्या काही विशेष जोरात नाही. त्यातही हिंदीपेक्षा अन्य भाषांमधील गाजलेल्या सिनेमांचे रिमेक बनवण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. पण फराह खान आणि रोहित शेट्टीने अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या “सत्ते पे सत्ता’चा रिमेक बनवायचे असे ठरवले आहे. मूळ “सत्ते पे सत्ता’मध्ये अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी हे लीड रोलमध्ये होते. मात्र या रिमेकमध्ये हेमामालिनी यांच्या रोलसाठी दीपिका पदुकोणला विचारण्यात आले आहे. फराह खानचे अमितभ बच्चन आणि हेमामालिनी या दोघांबरोबर खूप चांगले संबंध आहेत. तिच्या सांगण्यावरून या दोन्ही स्टारनी या रिमेकमध्ये छोटे छोटे रोल साकारायचेही मान्य केले असल्याचे समजते आहे. या रिमेकची स्क्रीप्ट लिहून पूर्ण झाली आहे. अमिताभ यांच्या रोलसाठी एक सुपरस्टार निवडला जाईल. तर त्यांच्या 6 भवांच्या रोलसाठी काही जुने तर काही नवीन चेहरे एकत्र आणलेले असणार आहेत. या वर्षाच्या अखेरीपर्यंत हा “सत्ते पे सत्ता”चा रिमेक फ्लोअरवर शुटिंगसाठी तयार असेल.