मुंबई – दगडी चाळ, नीळकंठ मास्तर, सतरंगी रे, झकास अशा अनेक मराठी चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ‘पूजा सावंत’ने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या फॅन्स पर्यंत पोहचवत शेअर करत असते.
दरम्यान, नुकताच पूजाने सोशल मीडियावर साडीतला साजश्रृगांर केलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. साडीत पूजाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.
View this post on Instagram
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. ‘जंगली’ सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती.