मुंबई – अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी ‘कुत्ते’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. असं असलं तरी सध्या तो त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलाच कॅचर्चेत आला आहे. अर्जुन मलायका अरोराला बऱ्याच दिवसांपासून डेट करतोय. तो कुठेही गेला तरी त्याच्यासमोर मलायका अरोराचा उल्लेख नक्कीच होतो. याचाच प्रत्येय अर्जुनने कुत्तेच्या प्रमोशनदरम्यान घेतला.
कुत्ते चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अर्जुन एका कार्यक्रमात गेला होता. तो स्टेजवर येताच प्रेक्षकांनी मलायका अरोराच्या नावाचा जयघोष सुरू केला. यानंतर यावर अर्जुन कपूरने अतिशय मजेशीर उत्तर दिले. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये कुत्ते स्टार अर्जुन कपूर आणि राधिका एका स्टेजवर असल्याचे दिसते. त्यावेळी प्रेक्षक मलायका मलायका ओरडू लागतात. यावर अर्जुन कपूर म्हणतो, ‘मलायका इथे नाही. आता राधिकाने काम चालून घ्या. यानंतर प्रेक्षक एकच गोंधळ करताना दिसतात.
View this post on Instagram
अर्जुन आणि मलायका खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत हे कोणापासून लपून राहिलेले नाही. अनेकदा दोघेही एकत्र स्पॉट होतात. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो देखील शेअर करत असतात. अर्जुनचा ‘कुत्ते’ हा चित्रपट जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.