चाहते म्हणतात,’सैफच्या लव आज कल पुढे साराचा चित्रपट काहीच नाही’

मुंबई : कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्यातील अफेअर चर्चानंतर इम्तियाझ अलीच्या “लव आज कल’ चित्रपटाच्या माध्यमातून सारा – कार्तिकला एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती, मात्र आज व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आज प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या आशेवर पाणी फेरले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून निगेटीव प्रतिक्रिया दुरून येत आहे.

 

View this post on Instagram

 

Our new Gaana out now ? ??‍♀️??‍♀️ #mehrama Link in bio!

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on


11 वर्षांपूर्वी सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांचा लव आज कल हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. हा सिनेमा इम्तियाज अलीनंच बनवला होता. परंतु दोन्ही सिनेमात बराच फरक दिसत आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की, सैफच्या लव आज कल पुढे साराचा सिनेमा कमजोर आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर लव आज कल 2 या सिनेमाला आलेल्या रिअ‍ॅक्शनवरून असं स्पष्ट दिसत आहे की, तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका. हा इम्तियाज अलीचा कमजोर सिनेमा आहे. एकानं सिनेमातील डायलॉग वापरत म्हटलं आहे की, तू मला वैताग द्यायला लागला आहे.  सारा आणि कार्तिकची रोमँटीक स्टोरी प्रेक्षकांना इम्प्रेस करू शकली नाही. अनेकांनी या सिनेमाला फ्लॉप म्हटलं आहे. एका चाहत्यानं म्हटलं आहे की, फुल टाईम बोरिंग आणि डी ग्रेड सिनेमा आहे. हा सिनेमा खूप बकवास आहे. यामुळे तुमच्या डोक्याच्या नसा खराब होतील.


सैफच्या सिनेमापुढे काहीच नाही साराचा लव आज कल 11 वर्षांपूर्वी सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांचा लव आज कल हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. हा सिनेमा इम्तियाज अलीनंच बनवला होता. परंतु दोन्ही सिनेमात बराच फरक दिसत आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की, सैफच्या लव आज कल पुढे साराचा सिनेमा कमजोर आहे. काहींना हा सिनेमा आवडला आहे ज्यांनी या सिनेमाला पॉजिटीव रिअॅक्शनही दिली आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.