बॉलीवूड व्यतिरिक्त आपल्या वर्कआऊटबद्दलही दिशा पटणी खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिच्या वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. या फोटोसेशनमुळे तिला शेकडो फॅन्सही मिळाले आहेत. तिच्या एनर्जिटिक लुकमध्ये तिच्या वर्कआऊटचा मोठा वाटा आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी आजकाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसते. दिशाने नुकताच तिचा एक वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
असाच आपल्या वर्कआऊटचा आणखी एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. त्यातून ती आपल्या व्यायामावर किती कष्ट घेत असते, हे दिसून येते. या व्हिडिओमध्ये ती फुल रेंज स्क्वॉट करताना दिसते आहे. एवढेच नव्हे, तर दिशेने तब्ब्ल 60 किलो वजन उचलून हे स्क्वॉट केले आहे.
व्यायामाच्या वेळी तिच्या खांद्यावर 60 किलो वजन ठेवलेले होते. एका सुसज्ज जिममध्ये तिचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे आणि त्याला लाईकही भरपूर मिळाले आहेत.दिशाचा हा व्हिडीओ जवळपास 24 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
दरम्यान, नुकतंच दिशा पटणीच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सनी संख्या 4 कोटी पेक्षा जास्त झाली आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने नुकताच माझे 4 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार असं दिशाने पोस्टमध्ये म्हटले आहे.