…म्हणून चाहते रमले ‘नमस्ते लंडन’ चित्रपटाच्या आठवणीत

रोहित शेट्टीचे सगळे सिनेमे कॉप ड्रामा सिनेमे म्हणून फेमस असतात. अजय देवगणचा “सिंघम’, “सिंघम रिटर्न्स’, रणवीर सिंहचा “सिम्बा’ ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. आता अक्षय कुमारला पोलिस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये घेऊन रोहित शेट्टी येतो आहे.  यातच या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेत्री कतरिना कैफ त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं शूट झाल. त्यानंतर सध्या अक्षय या सिनेमाच्या उर्वरित शूटिंग पूर्ण करत आहे.


दरम्यान या सिनेमातील एक इंटिमेट सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि विशेष म्हणजे खुद्द अक्षय कुमारनंच हा व्हिडीओ लीक केला आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयचं फिलहाल या गाण्याचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळाला. या गाण्यात अक्षयसोबत अभिनेत्री कृती सेननची बहीण नुपूर सेनन हिनं स्क्रीन शेअर केली आहे.

मात्र अनेकांना हे गाणं पाहिल्यावर अक्षय आणि कतरिनाच्या नमस्ते लंडन या सिनेमाची आठवण झाली. त्यानंतर अक्षयनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सूर्यवंशी सिनेमातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच बॉलिवूडमध्ये ‘बॅड मॅन’ म्हणून लोकप्रिय असणारे अभिनेते म्हणजे गुलशन ग्रोवर आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटामध्ये प्रमुख खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)