मुंबई – मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री ‘क्रिती सनॉन’ला हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. ‘हिरोपंती’ या चित्रपटानंतर तिने ‘बरेली की बर्फी’, ‘स्त्री’, ‘दिलवाले’, ‘कलंक’, ‘लुकाछुपी’, ‘पानीपत’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून क्रितीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यामुळेच क्रिती आजच्या घडीला लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
उत्तम अभिनयासोबतच आपल्या दिलखेच अदा, स्टाईल आणि तितक्याच बिंधास्त लूकमुळे अभिनेत्री क्रिती सनॉन लाखो दिलों की धडकन बनली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या क्रितीचा इंस्टाग्रामवर जबरदस्त असा फॅन फॉलोविंग आहे.क्रितीचा नुकताच अभिनेता अक्षय कुमार सोबत ‘बच्चन पांडे’ या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
दरम्यान, नुकतचं क्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने वन पीस परिधान केला आहे. या फोटोमध्ये ती वेगवेळ्या पोज सुद्धा देत आहे.
क्रिती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. फॅन्स सुद्धा तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. आणि याच कारणामुळे बॉलिवूडमध्ये दमदार अभिनय आणि लूक्सने क्रिती सनॉनने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.