मुंबई – बहुचर्चित ‘मिर्झापूर’ या वेबसीरीजने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. या वेब सिरीच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्या कलेचं विशेष कौतूक सुद्धा आलं.
बबलू, गुड्डू, कालीन भैया, मुन्ना भैया आणि डिंपी या सर्वच कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने फॅन्सच्या मनावर अधिराज्य निर्माण केलं आहे. हे सगळेच कलाकार अभिनयाच्या बाबतीत एका-पेक्षा ठरले आहे.
याच मिर्झापूरमधील अतिशय सोज्वळ आणि साध्य वेशात राहणारी डिंपी म्हणजेच, अभिनेत्री ‘हर्षिता गौर’ रियल लाईफमध्ये एकदम हॉट अँड ग्लॅमर्स आहे. डिंपी अनेकदा आपल्या हॉटनेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
हर्षिता उर्फ डिंपीचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या हर्षिता गौरने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती अतिशय हॉट आणि ग्लॅमर्स दिसत आहे. डिंपीचा हा हॉट लूक पाहून अनेकांना घाम फुटला आहे.
हर्षिताने मिर्झापूरमध्ये अगदी साधी पण लक्षवेधी भूमिका साकारल्याने फॅन्स तिचे दिवाने झाले होते. वेब सिरीजमध्ये सोज्वळ चेहरा आणि साध्य लूकमध्ये दिसणाऱ्या डिंपीचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. म्हणूनच तिच्या या फोटोंवर कमेंटचा पाऊस पडला आहे.