पुणे – मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज शनिवारी (दि. 26) पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेले 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान वयाच्या 77व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
सर्व नातेवाईक, संबंधी त्यांच्या भेटीसाठी आले होते. दरम्यान अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव पुण्यातील बालगंधर्व येथे ठेवण्यात आले आहे. तर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यसंस्कार होणार आहेत. गोखले यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आहे.
हेही वाचा – माझा हा दुसरा गुरूही गेला; अभिनेते शरद पोंक्षे शोकाकुल
गोखले हे लोकप्रिय अभिनेते होते. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व येथे चाहत्यांनी, नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. गोखले यांना अभिनय क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, रंगभूमी- अभिनयासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार आदी मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.
पाहा व्हिडीओ –