आगामी काळात रामायणावर बनणाऱ्या सिनेमामध्ये सीतेचा रोल करिना कपूर-खानला दिला जाण्याची चर्चा सुरू आहे. मात्र सिनेरसिक त्याला विरोध करायला लागले आहेत. या मुद्द्यावरून चक्क करिनावर बंदी घालण्याची चर्चा व्हायला लागली आहे. हॅशटॅग बॉयकॉट करिना कॅम्पेनदेखील सुरू झाले आहे.
याचे कारण म्हणजे करिनाने सीतेचा रोल करण्यासाठी तब्बल 12 कोटी रुपयांचे मानधन मागितले आहे. लोकांना याचा खूप राग आला आणि त्यांनी करिनाविरोधातला रोष व्यक्त करायला सुरुवात केली आहे. करिनाने एका मुस्लीम व्यक्तीबरोबर म्हणजेच सैफ अली खान बरोबर विवाह केल्याने तिने हा रोल करण्याला विरोध होतो आहे.
आता तर करिना कपूर ही करिना कपूर-खान बनली आहे. काहीजणांनी तर करिनाला शुर्पणखाचा रोल दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.मात्र, अद्याप करिनाला हे रोल ऑफर केला गेलेलाही नाही असे या सिनेमाचे लेखक व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी सांगितले आहे. मात्र, हे ऐकल्यानंतरही लोकांची शेरेबाजी सुरूच आहे. अशातच आता रावणाचा रोल चक्क रणवीर सिंह करणार असल्याचीही चर्चा ऐकायला मिळते आहे.