मुंबई – मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे ‘तेजस्विनी पंडित’. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली आहे.
चित्रपट, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते. आज ‘तेजस्विनी पंडित’चा वाढदिवस आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजस्वीनी नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
View this post on Instagram
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या तेजस्विनी पंडितनं आपल्या बोल्ड अँड ग्लॅमरस अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
View this post on Instagram
I may not be flawless but you know I’ve got a diamond heart. #godiskind #lifeisgood #tejaswinipandit
नुकतंच तेजस्विनीने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय मादक आणि ग्लॅमरस दिसत आहे. यात तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
View this post on Instagram
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. तसेच तेजस्विनी च्या चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.