Dhamal 4 : गेल्या अनेक दिवसांपासून चाहते धमाल ४ कधी प्रदर्शित होणार याची वाट पाहत होते. चित्रपटकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. मात्र, आता चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. बॅालीवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘धमाल’ च्या चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २०२६ च्या ईदच्या मुहूर्तावर १९ मार्च २०२६ या दिवशी प्रदर्शित होईल, अशी माहिती समोर आली होती. मात्र, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला असून, ३ जुलै २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा : Amisha Patel : गदर 3 बाबत आमिषाने दिली हिंट; चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच वर्तवलं ‘हे’ भाकित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे का ढकलली याबाबत देखील माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ आणि यशचा ‘टॉक्सिक’ हे मोठे चित्रपट रिलीज होत आहेत. त्यामुळे धमाल ४ च्या मेकर्सने रिस्क घेणे टाळत चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलेले आहे. आता ‘धमाल ४’ पाहण्यासाठी प्रेक्षकांना ३ जुलै २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. धमाल ४ मधील कलाकार मंडळी आणि दिग्दर्शक इंद्र कुमार या चित्रपटात पुन्हा एकदा आधीच्या भागात धमाल केलेले कलाकार दिसणार आहेत. अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. रवी किशन खलनायकाच्या भूमिकेत असून मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये हा देखील चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे. धमालच्या याअगोदरच्या तिन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता चौथ्या भागात काय बघायला मिळणार याची उत्सुकता वाढली असून, त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. हेही वाचा : Varun Dhawan : वरुण धवन पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल