-->

अंकिताचा ब्राइडल लुक पाहून चाहते आश्‍चर्यचकीत

बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह झाली आहे. ती आपले ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत आहे. अंकिताने नुकतेच ब्राइडल लुकमधील आपले फोटो पोस्ट करत लिहिले की, “सौंदर्य चेहऱ्यावर नसते, सौंदर्य हा तर हृदयाचा प्रकाश आहे.’ अंकिताचे हे फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याने घायाळ झाले आहेत.

सर्व कमेंट्‌स सेक्‍शनमध्ये अंकिताच्या सौंदर्याचे कौतुक करण्यात आले आहे. तर काही चाहत्यांनी कमेंट केले की, अंकिताला पाहून त्यांना सुशांत सिंह राजपूतची आठवण येते. “पवित्र रिश्‍ता’मधील अंकिता-सुशांतची जोडी खूपच प्रसिद्ध होती. ब्राइडल लुकमधील अंकिताचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

त्यावर असंख्य चाहत्यांच्या कमेंट्‌स येत आहे. दरम्यान, यापूर्वीही अंकिताने मराठमोळ्या लुकमध्ये आपले फोटो शेअर केले होते. या फोटो अंकिता हिरव्या रंगाच्या साडीत खूपच मोहक दिसत होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.