मुंबई – अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. कियारा ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. कियाराला भेटणे हे प्रत्येक चाहत्याचे स्वप्न आहेच. दरम्यान, कियाराने तिच्या एका चाहत्याबद्दल सांगितले, ज्याच्याबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल. कियाराच्या एका चाहत्याने तिची एक झलक पाहण्यासाठी त्याने चक्क 51 माजले चढाई केली.
अलीकडेच, पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत, कियाराला विचारण्यात आले की तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी काही वेडेपणा केला आहे का? यावर कियाराने खुलासा केला की तिच्या एका चाहत्याने लिफ्ट वापरण्याऐवजी तिच्या इमारतीच्या सर्व पायऱ्या कशा चढल्या. माझ्यासाठी ही सर्वात विचित्र गोष्ट होती. मी खूप उंच मजल्यावर राहते आणि तो मला भेटण्यासाठी माझ्या फ्लॅटच्या सर्व पायऱ्या चढला. तो आला तेव्हा त्याला खूप घाम फुटला होता.”
कियारा पुढे म्हणाली, “मी लगेच त्याला विचारले, ‘काय झाले? तू ठीक आहेस ना? तुला बसायचे आहे का? तुला पाणी हवे आहे का?” तर तो म्हणाला, ”नाही, मी पायऱ्या चढून आलो आहे. मला फक्त तुला कळवायचं होतं की तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस.” कियारा म्हणाली की ती विचार करू लागली “पण का? तुला लिफ्ट पण घेता आली असती.” कियारा पुढे म्हणाली ,’आता पुढच्या वेळी माझ्या घरी येऊ नकोस’.
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, कियारा नुकतीच वरुण धवन, नीतू कपूर आणि अनिल कपूरसोबत ‘जुग जुग जिओ’मध्ये दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 61.44 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. किनारा पुढे ‘गोविंदा नाम मेरा’ मध्ये विकी कौशल आणि भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे. जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन, खेतान आणि वायकॉम18 स्टुडिओजद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.