विकी कौशलने लॉकडाऊनच्या कालावधीत घरगुती कामे करण्याची हौस भागवून घ्यायचे ठरवले आहे. त्याने एक फडके घेतले आणि घरातील फॅन पुसून काढायला सुरुवात केली आहे. त्याने स्वतःच्या कामातला फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आपल्याला असेही काम करता येऊ शकते, यावर त्याचा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. सिलींगच्या फॅनची धूळ अंगावर आणि डोक्यावर पडू नये, म्हणून त्याने टोपी घातली आहे. तोंडाला रुमाल गुंडाळला आहे. कशाचाही आधार न घेता तो हात उंचावून फॅन स्वच्छ करतो आहे.
अशाच अवस्थेत त्याला स्वतःचीच चेष्ठा करण्याची हुक्की येते. “जिसका बेटा लंबा, उसका भी बडा काम है, पंखा साफ करवा लो, स्टूल का क्या काम है’ अशी कॅप्शन देऊन तो स्वतःच्या उंचीचेच कौतुक करतो. त्याच्या पोस्टला नेटिझन्सनी भरपूर लाईक दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच विकीन आपल्या आईबरोबरच्या गप्पांच्या वेळचा मस्त फोटोही शेअर केला होता. प्रामाणिकपणे लॉकडाऊनचे नियम पाळत असल्याचे त्याने आपल्या फॅन्सना सांगितले आणि असेच नियम पाळण्याचे आवाहनही केले होते.