प्रसिद्ध उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना अटक

परभणी – शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी रासप नेते आणि गंगाखेड येथील प्रसिद्ध उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या चौकशीच्या कारवाईनंतर रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे.

गंगाखेड येथील प्रसिद्ध उद्योजक, ‘गंगाखेड शुगर्स’चे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी २९ हजार शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर ३६० कोटींचे कर्ज उचलले होते. रत्नाकर गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०१४ पासून २०१७ पर्यंत बनावट कागद पत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेण्यात आले होते. तालुक्यातील काही शेतकऱ्यांना कर्जाची गरज पडली तेंव्हा सीबील रिपोर्टमध्ये आपल्या नावावर कर्ज घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते.

,

Leave A Reply

Your email address will not be published.