मुंबई – बॉलिवूडला आणखी एक मोठा झटका बसला आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर ‘सरोज खान’ यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं . त्या 71 वर्षांच्या होत्या. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, मध्य रात्री त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे.
Choreographer Saroj Khan passes away at the age of 71, in Mumbai. She was admitted to hospital on June 20 after she complained of breathing issues. pic.twitter.com/yxypJddLh7
— ANI (@ANI) July 3, 2020
सरोज खान यांचा समावेश बॉलीवूडच्या दिग्गज नृत्यदिग्दर्शकांमध्ये होतो. त्यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना नृत्याचे धडे दिले होते. कलाक्षेत्रातील योगदानासाठी सरोज खान यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.