प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे निधन

मुंबई – बॉलिवूड, हॉलिवूडच्या प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आहे. सेहर लतीफ यांना किडनीचा विकार झाला होता. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांच्यांवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र, उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली आणि अखेर त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनेता प्रीत कमानी यांनी सेहर लतीफ यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सेहर लतीफ यांनी अनेक चित्रपटांचे कास्टिंग डायरेक्टर केले आहे. यामध्ये ‘लंच बॉक्स’, ‘मॉनसून शूटआउट’, ‘शंकुतला देवी’, ‘दुर्गामति’, ‘मस्का’ यांसारख्या चित्रपटांचे त्यांनी कास्टिंग केले आहे. याशिवाय ‘भाग बिनी भाग’ नावाच्या वेब शोचंही कास्टिंग करत होत्या. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला चित्रपट ‘मस्का’ आणि वेब शो ‘भाग बिनी भाग’ला आपलं प्रोडक्शन हाऊस ‘म्यूटंट फिल्म्स’ अंतर्गत प्रोड्यूसही केले होते.

हॉलिवूडमध्ये सुद्धा अनेक चित्रपटांचे सेहर लतीफ यांनी कास्टिंग केले आहे. यामध्ये ‘ईट लव प्रे’, ‘फ्यूरियस 7’, ‘टाइगर्स’, ‘वॉइसरॉयज हाऊस’, ‘मॅकमाफिया’, ‘सेंस 8’ या चित्रपटांचा समावेश आहे.

‘गोल्ड’, ‘शकुंतला देवी’ आणि ‘नोबेलमॅन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही सेहर लतीफ यांचे नाव जोडले गेले होते. त्यांना ‘जीरो डार्क थर्टी’, ‘द गुड करमा हॉस्पिटल’, ‘बेस्ट एक्जॉटिक मेरीगोल्ड हॉटेल’, ‘द मॅन हू न्यू इंफिनिटी’, ‘मिलियन डॉलर आर्म’, ‘लाइन ऑफ डिसेन्ट’ यांसारख्या विदेशी चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांची कास्टिंग करण्यासाठी श्रेयं दिले जाते. सेहर लतीफ यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातून अनेक कलाकारांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.