सिडनी – ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध क्रिकेट पंच ब्रुस ऑक्सेनफोर्ड या वर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत, अशी माहिती आयसीसीने दिली आहे.
आयसीसीच्या पंच एलिट पॅनेलचे सदस्य असलेल्या ऑक्सेनफोर्ड यांनी आतापर्यंत 179 आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे. यात 62 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. त्यांनी 2006 साली पदार्पण केले.
ऑक्सेफोर्ड यांनी कारकिर्दीत तीन विश्वकरंडक, तीन टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत पंचाची भूमिका बजावली आहे. त्यांनी महिलांच्या 2012 व 2014 मधील विश्वकरंडक टी-20 स्पर्धेतही पंच म्हणून काम केले आहे. पंच होण्यापूर्वी ऑक्सेनफोर्ड यांनी क्वीन्सलॅंड संघाचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. ते लेग स्पिनर होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिस्बेन येथे झालेला चौथा कसोटी सामना हा ऑक्सेफोर्ड यांचा अखेरचा सामना होता. निवृत्तीनंतर ते देशांतर्गत स्पर्धेत पंच म्हणून काम पाहणार आहेत.