मुंबई – वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा म्हणून पतीने तब्बल आठ वेळा पत्नीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार दादरच्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या एका कुटुंबात घडला आहे. विशेष म्हणजे पीडित महिला एका न्यायाधीशाची मुलगी आहे.
वंशाचा दिवा मिळावा म्हणून पीडितेला परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपात केला. त्यानंतर मुलगा होत नाही म्हणून आरोपींनी पीडितेला घराबाहेरही काढलं. दरम्यान मुलीने दादर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.
गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यासह हुंड्यासाठी छळ व अन्य कलमांतर्गत पतीसह सासरच्या मंडळी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.