सखी मतदार केंद्रात कौटुंबिक सोहळ्याचा अनुभव

सेल्फी पॉइंट

महिलांचा व तरुणाईचा मतदानाबाबत उत्साह वाढविण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. या ठिकाणी खास सेल्फी पॉइंट म्हणून लोखंडी कमानी उभारण्यात आल्या होत्या. या ठिकाणी जो तो आपला फोटो मोबाईलमध्ये काढत होता. महिलांनी, युवतींनी तसेच पुरुषांनादेखील येथे सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

नगर  – लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पहिल्यांदाच महिला मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने आणि जिल्हा प्रशासनाने नवीन पाऊल उचलले. विधानसभा क्षेत्रनिहाय सखी मतदान केंद्र (ऑल वुमेन पोलिंग बुथ) तयार करण्यात आले होते. नगर शहरात चार केंद्र होते. यामध्ये अ.ई.एस. डीएड कॉलेज व आयकॉन पब्लिक स्कुल या दोन ठिकाणी सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी मतदानाला आलेल्या महिलांशी संवाद साधला असता, येथे येऊन अगदी कौटुंबिक सोहळ्यात आल्यासारखं वाटत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या केंद्रामध्ये मतदानासंबंधी सर्व प्रक्रियेचे संचालन महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने केले. केंद्राच्या सुरक्षिततेची जबाबदारीदेखील महिला पोलिसांनीच केली. महिलांनी निर्भिडपणे मतदान केंद्रावर पोहचून मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपला मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावावा, हा यामागील उद्देश होता. नगर शहरासह या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघात शेवगाव, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा व कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात 10 मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते.

शेवगाव मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 133 – जिल्हा परिषद शाळा भगुर, राहुरी मतदार संघातील मतदान केंद्र क्र.50- नूतन मराठी शाळा नंबर 1 राहुरी बुद्रुक, पारनेर मतदार संघातील मतदान केंद्र क्र.184- पारनेर इंदिरा विकास भवन मेन हॉल, जुन्या तहसील ऑफीस जवळ पूर्व बाजू पारनेर, श्रीगोंदा मतदार संघातील मतदान केंद्र क्र.247 श्रीगोंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा शहर, कर्जत जामखेड मतदार संघातील मतदान केंद्र क्र.106 जामखेड ल.ना. हौशिंग विद्यालय जामखेड, मतदान केंद्र क्र. 194 जिल्हा परिषद शाळा, भांडेवाडी यांचा सखी मतदान केंद्र होते.

गुलाबी रंगाने सजले मतदान केंद्र सखी मतदान केंद्र संपूर्ण गुलाबी आणि पांढऱ्या रंगाने सजविण्यात आले होते. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या फुग्यांनी संपूर्ण परिसर फुलून गेला होता. त्याबरोबर मतदान केंद्रासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मतदान केंद्रात पुगे लावण्यात आले होते. परंतु मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारापासून सजावट करण्यात आली होती. त्यामुळे येणाऱ्या मतदारासह वेगळाच अनुभव या सखी मतदान केंद्रांच्या माध्यमातून आला.

जागोजागी रांगोळी, स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. केंद्रातील महिला अधिकारी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व महिलांनी एकसारख्या साड्या परिधान केल्या होत्या. त्यात दिल्ली दरवाजा येथील अ.ई.एस. डीएड्‌ कॉलेजमधील दोन्ही मतदान केंद्रांची सजावट मतदारांसाठी आकर्षिण करीत होती. अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. पाहता क्षणीच कुठल्या लग्नसमारंभात आल्यासारखे भासत होते. पोलीस महिला कर्मचारी मतदारांचे स्वागत करीत होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.