आंख मिचौली या आगामी फॅमिली ड्रामाची घोषणा करण्यात आली आहे. डायरेक्टर म्हणून उमेश शुक्लाकडे या फॅमिली ड्रामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उमेश शुक्लाने यापूर्वी “ओह माय गॉड’ आणि “102 नॉट आऊट’चे डायरेक्शन केले होते. सोनी एन्टरटेनमेंटचे प्रॉडक्शन असलेल्या “आंख मिचौली’चे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले.
परेश रावल, शर्मन जोशी, दिव्या दत्ता आणि विजय राज यांच्यासह डझनभर कलाकारांची गर्दी या पोस्टरमध्ये दिसते आहे. येत्या दिवाळीमध्ये हा सिनेमा रिलीज होईल आणि भारतासह युरोपातल्या काही देशांमध्ये सिनेमाचे शूटिंग होणार आहे. पोस्टरवर जी नातेवाईकांची गर्दी दिसते आहे, त्यातून एकत्र कुटुंब असलेल्या एका घरातली ही कथा असावी असे वाटते. बऱ्याच दिवसात एकत्र कुटुंब असलेली कथा बॉलिवूडमध्ये आलेली नाही.
यापूर्वी “कपूर ऍन्ड सन्स’नंतर तसा प्रयोग झाला नव्हता. “हम आपके है कौन’पासून फॅमिली ड्रामा ही थीम बॉलिवूडमध्ये प्रस्थापित झाली आहे. मात्र, प्रेमाचे त्रिकोण आणि ऍक्शनचा भडिमार हेच बॉलिवूड निर्मात्यांना भावले. मात्र, आता पुन्हा तसा प्रयोग “आंख मिचौली’मध्ये होणार आहे.