फॅमिली डॉक्‍टरला पोलीस कोठडी

पंचकर्म उपचाराच्या नावावर केलेले चित्रीकरण प्रसिध्द करण्याच्या बहाण्याने केला बलात्कार

पुणे : उच्चशिक्षित तरुणीवर पंचकर्म उपचार करण्याच्या बहाण्याने चित्रीकरण करुन ते सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणात फॅमिली डॉक्‍टरला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

सुरेश वाडीयार ( वय 36, कोंढवा) असे त्या डॉक्‍टचे नाव आहे. याबाबत 22 वर्षीय पीडित तरूणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. ती मार्च 2018 पासून पाठ व खांद्याच्या दुखापतीच्या उपचारासाठी डॉक्‍टरकडे जात होती. बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर येथील शिवराजनगर येथे वाडीयार याचे आयुर नावाचे क्‍लिनिक आहे. वडीयार हा तरुणीच्या कुटुंबाचा फॅमिली डॉक्‍टर होता.

त्यांचा डॉक्‍टरवर विश्‍वास होता. त्यामुळे संबंधित तरुणी उपचारासाठी त्याच्या क्‍लिनिकमध्ये गेली होती. तिथे त्याने तिचे चित्रीकरण केले. तिला ते चित्रीकरण सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्याशी वारंवार बिबवेवाडी येथील क्‍लिनिकमध्ये, कोंढवा बुद्रुक येथील त्याच्या घरी बोलावून शारीरिक संबंध ठेवत होता. त्याच्या अत्याचाराला कंटाळून तिने घडलेला प्रकार घरी सांगितला. तिचे वकील. ऍड हेमंत झंजाड, ऍड. अरविंद खांडरे यांच्यामार्फत याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली.

याप्रकरणी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी डॉक्‍टरकडून केलेले चित्रीकरण जप्त करण्यासाठी, ते व्हिडिओ त्यांनी कोठे स्टोअर केलेले आहेत. ते सर्व साहित्य जप्त करायचे आहे. तसेच, त्यांनी आणखी कोणाची या पद्धतीने फसवणूक केली आहे का, याबाबत तपास करायचा आहे, त्यासाठी त्याची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

आरोपी विक्षिप्त मनोवृत्तीचा असून, त्याने संबंधित तरुणीचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केले आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद फिर्यादीतर्फे ऍड. हेमंत झंजाड यांनी कोर्टात केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.