पुणे – कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या 2023-2024 च्या कार्यकारणी निवडणूकीत सर्व महिला पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अॅड. वैशाली चांदणे यांची सहाव्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आहे. एखाद्या वकील संघटनेच्या सर्व पदाधिकारी महिला असल्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात आले.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मनिषा काळे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी न्यायाधीश संगीता पहाडे, न्यायाधीश राघवेंद्र आराध्ये, न्यायाधीश गायकवाड, न्यायाधीश कदम उपस्थित होते.
या कार्यकारणीमध्ये अध्यक्ष पदी अॅड. वैशाली चांदणे, उपाध्यक्षपदी अॅड.निवेदिता कुंठे, अॅड. राधिका पुरोहित, सचिवपदी अॅड. मीनाक्षी डिंबळे, सहसचिवपदी अॅड. सुश्मिता जगताप, खजिनदारपदी अॅड. शानुर शेख, सदस्य म्हणून अॅड. लिना किराड, अॅड. संध्या फडतरे, अॅड. अपर्णा मोरे, अॅड. अम्रपाली कसबे, अॅड. सविता यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रगती पाटील यांनी केले. अॅड. विजय सरोदे यांनी सुत्रसंचालन केले. तर, अॅड. अजय डोंगरे यांनी आभार मानले. अॅड. चांदणे म्हण्ल्या, देशात पहिल्यांदाच वकील संघटनेच्या पदाधिकारी म्हणून सर्व महिलांची निवड झाली आहे. ही अभिमनास्पद बाब आहे.